Saturday 21 May 2011

मनाचे...मनाशी...

प्रत्येक क्षणी जगताना मनात सतत काहीना काही चालू असतंच. आजवर मनातलं मनाशीच बोलत होते, पण यापुढे माझ्या मनातलं आपल्या सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे. यात अट एकच...वाचताना मन लावून वाचावे लागेल...अहो नाहीतर 'मनाचे...मनाशी...' पोचणार कसे?
मनात येईल ते मोकळेपणे मी आपल्याशी शेअर करणार आहे. रोजची कामं करताना...कित्येक गोष्टी मनात घोळत राहतात, पण जगण्याच्या ओघात व्यक्त करायच्याच राहून जातात. पण म्हणून त्या नष्ट होत नाहीत, तर मनाच्या तळघरात साठत जातात, मग कधी त्याच्या कविता होतात, कधी सूर होतात, कधी कथा, कधी चित्रही तयार होतात मग याचा ब्लॉग का होऊ नये?
 
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात हळूच  डोकावून पाहायला आवडणाऱ्यासाठी हा ब्लॉग आहे, बंद खोलीत एकट्यात अश्रू गाळून वरवर हसणाऱ्यासाठी हा ब्लॉग आहे, जगाची फिकीर न करता आपल्याच धुंदीत राहणाऱ्या मस्तवालांचा हा ब्लॉग आहे, इथे यायला कोणालाच पाबंदी नाही.
इथे काय लिहायचे हा विचारच मी केलेला नाही. कारण,तसं काही न ठरवताच लिहण्यात मजा असते.' काहीतरी बरळणारी पोरगी' म्हटलं तरी चालेल, पण हे बरळणे निरर्थक नसेल एवढे नक्की!

5 comments:

  1. .....पोहोचले हो....!!! असेच चालू राहू द्या....!!! वेळ मिळाल्यास अवश्य वाचू...!!! :-)

    ReplyDelete
  2. Hi
    Anuja Chaan lihilya!
    mi pahilyandach blog la reply det aahe.
    any way - artical point che kay zale.
    sulabha shertate

    ReplyDelete
  3. तुझ्या या उपक्रमाला अनंत आशीर्वाद! एकच सूचना: इतरांना वाचण्यात रस वाटेल, असं लिहिण्याचा प्रयत्न कर.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. मागच्या आठवड्यात मी एक चित्रपट पाहिला...द बीवर....मेल गिब्सनचा...आपण स्क्रीझोफेनियाच्या केसेस ऐकतो तसेच काही चित्रपट हि पाहिले आहेत त्याविषयावर...हा हि त्यात एक..मनात विचार आला..सुरुवात करूया एका गूढ विषयाने..."मन...अवचेतन कि...थांबलेले????"



    मनात आपल्या खूप विचारांचा कल्लोळ चाललेला असतो...कधी कळत तर कधी नकळत...जेव्हा ते कळत असते तेव्हा आपल्याला काहीसा त्रास होतो कारण मानसिक ताण येतो रक्त प्रवाहावर जोर येतो....पण जेव्हा ते नकळत असते..तेव्हा....आजवर या विषयावर खूप संशोधन चालू आहे...subconscious mind ..गहिरे पाणी...मानस शाश्त्रासाठी अजून हि अवचेतन मन हे गूढ आहे..आपण विचार करतो सांप्रत स्थितीचा...पण काही वेळा भूतकाळात काही अशी बीजे रोवली जातात जी मेंदूच्या एका गुप्त साच्यात गुंतली जातात आणि आपणास त्याची कल्पना नसते....पण हळू हळू एखाद्या गोष्टीचा अनायासे त्या बीजांशी संबंध आला कि ती बीजे त्या मेंदूच्या साच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात....वेळीच आपल्या सांप्रत मनाला त्याची कल्पना नाही आली कि ती बीजे हळू हळू फोफावतात....त्याचे परिणाम हळू हळू दिसू लागतात...कधी कधी माणूस स्वताशीच बोलतो....ती भूतकाळातली बीजे कुणा एका व्याक्तीसाम्बंधित असतील तर ती बीजे त्या व्यक्तीची प्रवृती होतात..आणि मग....हळू हळू एका अनामिक प्रवासाला सुरुवात होते....स्क्रीझोफेनिया किंवा तत्सम विकार हे ह्याच बीजांची विषारी फळे बनतात...



    सर्जरी च्या वेळी भौतिक अंगांना सुरळीत आणता येऊ शकते कारण ते आपल्या सर्जनच्या आवाक्यात असते..पण मनाचे तसे नाही...मानस शास्त्र जितके सोपे तितकेच कठीण हि...ते प्रत्येक मनावर अवलंबून असते...प्रत्येक मनाचे स्वताचे वेगवेगळे कंगोरे असतात....psychologist साठी ते कंगोरे शोधणे म्हणजे एक आव्हानच असते....काही वेळा मनाचा गुंता इतका विचित्र असतो कि तो सोडविण्यास कधी कधी काल्पनिक पात्रांचा समावेश करावा लागतो...(रात्र आरंभ आठवून पहा..)



    मानसिक रुग्ण / वेडा हे हि या अवचेतन मनाचे काही अंशी बळी....पण ह्यांची स्तिथी वेगळी असते...काही आकस्मिक घटना / मानसिक आघात / मेंदूला बसलेली दुखापत ह्यामुळे यांची बौद्धिक वाढ होत नाही.. ह्या सार्यात त्यांचे मन सांप्रत स्थितीशी जुळवून घेत नाही....ते त्या घटने भोवती थिजून राहते....बर्याचदा अशा केसेस यशस्वी होतात कारण त्या घटनेचा परीमांश थिजलेल्या मनाला देण्यात यश येते...



    या सार्यापासून निदान दूर राहायचे तर मनावर विजय मिळविणे जरुरी आहे....फेसबुक / चाटिंग चा वेळ कमी करून आध्यात्मिक विचारांना वेळ दिला तर खूप सार्या गोष्टीना आळा घालता येईल...अगदीच तितके नाही तर आपल्या कुटुंबीयांकडे / चांगल्या मित्रमैत्रिणीकडे मन मोकळे करा...पण चाट करून नव्हे तर प्रत्यक्ष स्वमुखाने बोलून...आजकाल ऑन लाईन रिलेशन चे प्रमाण हि वाढत आहे....त्यातही मग असे त्रस्त झालेले युवक दिसतात...मनाचा कोंडमारा दूर करणे हेच मनोविकारांपासून सावध राहण्याचा उत्तम उपाय आहे...



    तात्पर्य : एक ब्लोग म्हणून मनाचा परामर्ष घेणे खूपच कमी आहे....पण किंबहुना एक सुरुवात म्हणून का होईना...योग्य दिशा तरी मिळेल ह्या गहिर्या पाण्याचा थांग घेण्यात!!!!

    ReplyDelete